नागपूर । डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
डॉक्टरांसंदर्भात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर टोकाची प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
नागपुरसह राज्यात ह्यकोरोनामुळे वाढणारे मृत्यू हे गंभीर आहेत. शिवाय आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.