जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासूनची बऱ्यापैकी सातत्याने सुरु असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आता जलसाठा वाढल्याने आज सकाळी हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले गेले आहेत .
आज सकाळी ९ वाजता हे १ २ दरवाजे उघडले तेंव्हा हतनूर धरणातील एकूण जलसाठा ( पाण्याची पातळी) २१०. ०६० मीटर्स होता. ४०३७१.०० क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग या १२ दरवाज्यांमधून सुरु होता . गेल्या २४ तासांत हतनूर धरण क्षेत्रात २४ . ० मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे .