जळगाव प्रतिनिधी । येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तिज या उत्सवानिमित ऑनलाईन विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकालही जाहीर झाला. महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
प्रथम रक्षा बंधननिमित घेण्यात आलेल्या राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी विविध कलाकुसर वापरून राखी बनवल्या. यात स्नेहल तोतला यांनी परीक्षण केले. यात प्रथम निर्मला जाखेटे, द्वितीय शीतल विकास काबरा, तृतीय गीता जाखेटे यांनी बक्षीस मिळविले. तिज महोत्सवानिमित्त पिंडा बनविण्याची स्पर्धा झाली. त्यात शीतल भराडिया यांनी परीक्षण केले. तर स्पर्धेत प्रथम लीना काबरा, शीतल विकास काबरा, तृतीय निर्मला जाखेटे यांनी यश मिळविले.
तिज नाट्य स्पर्धेत प्रथम श्रीकांता व अमृता मणियार, द्वितीय निर्मला व अनुश्री जाखेटे, तृतीय संगीता व नीता दहाड तसेच उत्तेजनार्थ किरण व दिव्या झंवर यांनी प्राविण्य मिळविले. हर्षिता तापडिया यांनी परीक्षण केले. नृत्य स्पर्धेत प्रथम प्रणाली व समृद्धी देपुरा, द्वितीय निर्मला व अनुश्री तर तृतीय लतिका व रचना मंत्री यांनी बक्षीस मिळविले, उत्तेजनार्थ सुरभा व लिशा छाब्रावाल, नीता व स्वाती दहाड यांनी बक्षीस मिळविले.
स्पर्धेसाठी अध्यक्ष मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी, सुवर्णा मुंदडा, अरुणा मंत्री, शीतल मंत्री आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.