जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी व शहरातील गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. शहरातील शास्त्री टॉवर चौकात शहर वाहतूक आणि शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दुचाकी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी बेशिस्तवाहन धारकांवर वाहतूक पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली.
जळगाव जिल्ह्यात कोरोना १४ हजाराच्या उंबरठ्यावर असतांना शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. असे असतांना काही नागरिक व दुचाकीधारक मास्क न लावता फिरणे, ट्रिपल सिट घेवून फिरणे, बिनाकारण बाहेर फिरणे आणि लायसन्स सोबत न बाळगणे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशनानुसार शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यामानाने शहरातील शास्त्री टॉवर चौकात बेशिस्तवाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/344318153249974