Home राजकीय विवरे बु॥ उपसरपंचपदी कविता पुराणे यांची निवड

विवरे बु॥ उपसरपंचपदी कविता पुराणे यांची निवड


WhatsApp Image 2019 03 05 at 6.09.50 PM

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील विवरे बु॥ ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र प्रल्हाद वासनकर हे रजेवर गेल्याने त्यांच्या पदावर उपसरपंचपदी सौ. कविता विजय पुराणे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच सुनिता सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत उपसरपंच रविंद्र वासनकर यांची रजा मंजूर करण्यात आली. उपसरपंच रजेवर गेल्याने त्यांचे जागेवर उपसरपंच पदासाठी सौ. कविता विजय पुराणे यांचे नाव ग्राम पंचायत संदस्य वासुदेव नरवाडे यांनी सुचवले, त्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. या बैठकीला उपसरपंच रविंद्र वासनकर, वासुदेव नरवाडे, प्रा. जनार्दन पाचपांडे, भागवत महाजन, चतुर राणे, शे. शकील, सौ. वर्षा सपकाळ, फातमा तडवी, निलीमा राणे, नुरबानो शेख शकील, संगीता राणे, भारती गाढे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत पवार उपस्थित होते.

यांनी केले अभिनंदन
उपसरपंचपदी सौ. पुराणे यांची निवड झाल्याने माजी सरपंच आशा नरवाडे, भारती जिरी, सुरेश इंगळे, विजय नरवाडे, विलास सपकाळ, मनोहर राणे, नरेंद्र राणे, विष्णू महाजन, जनार्दन जुनघरे, देवेंद्र सपकाळ, गणेश सणंसे, किशोर महाजन, पंकज सपकाळ व महेंद दांडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound