मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहार आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना डिस्चार्ज देत दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
बीएमसीने एसएमएसद्वारे मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार आहे, असे विनय तिवारी यांनी ‘एएनआय’ला सांगितले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे मुंबईत २ ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. परंतू मुंबईत आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. बिहार पोलिसांनी तिवारी यांना पुन्हा बिहार येण्यास परवानगी मागितली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून तिवारी यांना गुरुवारी रात्री उशीरा दिले. त्यामुळे ८ ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने दिली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.