Home आरोग्य नागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

नागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

0
32


नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले.

 

 

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले भगवान शेजूळ (५४) यांचे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले. तसेच धंतोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ सहारे यांना छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात नेले असता त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील तणाव वाढला आहे.


Protected Content

Play sound