अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप शेटजी हे भविष्याचा विचार करणारे होते. शिक्षण व्यवस्थेत सर्व अडचणी सरकार पूर्ण करु शकत नाही. म्हणुन समाजाचा सहभाग फार महत्वाचा आहे. शिक्षणा सारखे दुसरे पुण्य नाही. संस्कारक्षम पीढ़ी निर्माण व्हावी, ही अपेक्षा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. ते येथील प्रताप महविद्यालयातील कै.काकासाहेब शंकरराव राणे नाट्य सभागृहात विविध नामकरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर सुरेशदादा जैन(माजी मंत्री ),अमरिशभाई पटेल(आमदार), डॉ बी एस पाटील, पुष्पलता पाटील (नगराध्यक्ष),माजी आमदार कृषिभुषण साहेबरावदादा पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी ,ललिता पाटील, प्राचार्या डॉ ज्योती राणे,प्राचार्य डॉ रविन्द्र माळी, राणे व भांडारकर कुटुंबीय,खा शी चे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल,कार्यापाध्यक्ष जितेंद्र जैन,डॉ. संदेश गुजराती, हरि भिका वाणी, योगेश मुंदडे,कल्याण पाटील,प्रदीप अग्रवाल कमल कोचर, वसुंधरा लांडगे आदी उपस्थित होते.
श्रीप्रसाद शरदचन्द्रजी भांडारकर आणि अॅड शशिकांतजी राणे या दोघांच्या उदार अंत: करणाने जाहिर केलेल्या देणगीतुन हा नामकरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव हे होते. या समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर वसुंधरा लांडगे यांच्या भाव गंध दरलुन आला,सुखदायी भासे मणाला या स्वागत गीताने झाली. खा शी च्या माजी सर्व जेष्ठ संचालकानी उपस्थित सर्व मान्यवराचा यथोचित सत्कार केला.
प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रयोजन वा प्रास्ताविक निरज अग्रवाल यांनी केले. त्यानंतर सुहास राणे, शरद भांडारकर यांनी देणगी देण्या मागील भुमिका स्पष्ट केली.त्या नंतर शिरिषदादा चौधरी, कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात बोलताना अनिल राव सर म्हणाले की, संस्थेच्या यशा करिता चतु :सुत्री महत्वाचे आहे. उद्देशात स्पष्टता,शुद्ध चारित्र्य,सामुहिक निर्णय,शास्वत व्यवस्था,या प्रमाणे सात्विक भाव सुद्धा आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. अमरिशभाई म्हणाले की,आपले व्हिजन 30 ते 40 वर्षा पुढचे असणे गरगेचे आहे.शिक्षण व्यवस्थेत सर्वागीण बदल होणे सुद्धा आवश्यक आहे.या करिता रोजगाराभिमुख अभ्यास क्रम असावेत.
या प्रसंगी सभागृहात बजरंग अग्रवाल, कुंदन अग्रवाल,गोविन्ददादा मुन्दडे, विनोदभय्या पाटील, प्रा रमेश बहुगुणे,डॉ एस आर चौधरी, एल ए पाटील, प्रा ए एम जैन,डॉ मधुकर शिंदे, प्रा सोमानी,डॉ भावे,डॉ देशपांडे यु जी,मा मनोहर बडगुजर, आर पी बड गुजर, बबलु पाठक, अनिल रायसोनी,महावीर पहाडे, प्रवीण रामलाल जैन,डॉ करमपुरवाला,खोडके दादा,डॉ जयेश गुजराथी, सर्व उप प्राचार्य,शिक्षक-शिक्षकेत्तर वर्ग, सर्व मुख्याध्यापक यांच्यासह विविध शेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रस्तुत समारंभाचे सूत्र संचालन राजु महाले यांनी केले. त्यांना दीक्षा जैन या विद्यार्थीनीने उत्तम साथ दिली. तर योगेश मुंदडे यांनी मानले.