यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथे आज अयोध्या येथे झालेल्या शिलान्यास कार्यक्रमाचे औचित्य साधून नव्वदच्या दशकात कारसेवेसाठी गेलेल्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अयोध्या येथे आज भव्य कार्यक्रमात श्रीराम मंदिराचा शिलान्यास करण्यात आला. याचे औचित्य साधून नवतरुण मित्र मंडळ भजे गल्ली भालोद यांनी १९९२ साली आयोध्या येथे गेलेल्या कार सेवकांचा सत्कार आयोजित केला. याप्रसंगी संजय पाटील, संजय ढाके, निळकंठ अमृत पिंपळे, हरचंद चौधरी, दिलीप चोपडे, चंद्रकांत चौधरी, मधुकर जंगले, दिलीप इंगळे, शिरीष नेहेते, शशिकांत इंगळे, शशिकांत गाजरे, बबन कोळी, दुला जावळे, वना दांडगे यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच धनराज पिंपळे व वसंत जावळे हे हयात नसल्यामुळे त्यांच्या मुलांचा सत्कार शाल श्रीराम नाव लिहिलेली एक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रभू श्री रामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शशिकांत गाजरे यांनी आपले त्या वेळेस कारसेवकांना आलेल्या प्रसंगांच्या आठवणींना उजळ देत मनोगत व्यक्त करून तिथला अनुभव सांगितला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, नितीन लहू चौधरी, मोहन जावळे, मुरलीधर इंगळे, शशिकांत महाजन, मीनल जावळे, आधी नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
तसेच पंचवटी मधील राम मंदिरात सकाळी आठ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत पूजा व आरती करण्यात आली. सोशल डिस्टन्सींग ठेवून कार्यक्रम पार पाडण्यात आला.