धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून यात तालुक्यातील १५ रूग्ण पॉझिटीव्ह आले आहे. त्यात शहरातील ३ तर अंजनविहीरे, वाघळूद बुद्रुक, वाकटुकी, पष्टांने बुद्रुक,वराड खुर्द, पारधी खुर्द, बोरखेडा येथील रुग्णांचा समावेश आहे. यावृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.
तालुक्यातील काही संशयित रूग्णांचे स्वॅब धरणगाव कोवीड केअर सेंटरकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील तालुक्यातील १५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. धरणगाव शहरातील जैन गल्ली १, हेडगेवार नगर १, जळगाव शहर १, अंजनविहीरे २, वाघळूद बुद्रुक १, वाकटुकी ३, पष्टांणे बुद्रुक २ तर वराड खुर्द, पारधी खुर्द, बोरखेडा येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ५५३ झाली असून आत्तार्पंत ३२ रूग्ण मयत झालेत. तर ४१७ जण बरे होवून घरी सोडण्यात आले. आजच्या परिस्थिती १०४ रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.