Home क्राईम आजाराला कंटाळून वृध्देची गळफास घेवून आत्महत्या

आजाराला कंटाळून वृध्देची गळफास घेवून आत्महत्या

0
101

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका ६५ वर्षीय वृध्देने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकी आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरात राहणाऱ्या मालबाई जानराव वावरे (वय-६५) या वृध्देने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मालबाई यांना पोटाचा अल्सर होता. त्यामुळे ते सतत नैराश्यात होत्या. मंगळवारी सकाळी त्यांनी राहत्या घरातच गळफास घेतला. हा प्रकार मुलाच्या लक्षात आला, त्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता ९.३५ वाजता वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक गणेश कोळी, निलेश भावसार व संदीप धनगर करीत आहेत.


Protected Content

Play sound