फैजपूर, प्रतिनिधी । येथे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी वर्ष जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे नगर फैजपूर, नगरपरिषद व पोलिस स्टेशन फैजपूर अशा तीन ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एपीआय प्रकाश वानखेड़े व फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण होते. तसेच कार्यक्रमात बार्टीचे रावेर तालुका समतादूत युनुस तडवी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य व साहित्यांबाबत प्रबोधन केले. अशा थोर महापुरूषाच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन जयंती पंधारवड्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या अभिवादन कार्यक्रमात फैजपुर नगरपरिषदेचे नगरसेवक प्रभाकर सपकाळे, इरफान शेख ,नगरसेवक अमोल निम्बाळे, समाजसेवक नाना मोची, समाजसेवक समीर तड़वी, उद्योजक विजय अठवानी, पिंटू तेली आणि कार्यक्रम आयोजक आतिश चंदनशिव, घनश्याम चंदनशिव, किशन चंदनशिव, मातंग समाज प्रभारी प्रभारी मनोज चंदनशिव, अर्जुन चंदनशिव, अक्षय चंदनशिव, रोशन बोदड़े, सुरेश बोडडे, शांताराम मोरे, हेमंत चंदनशिव, राहुल चंदनशिव ,अमन वाघमारे, संदिप चंदनशिव, आणि सर्व समाज बांधव उपस्तित होते.