Home क्राईम पत्नीस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित

पत्नीस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित

four Police Suspended Suspension In chopda dharangaon Case
four Police Suspended Suspension In chopda dharangaon Case

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्या निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज काढले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै २०२० रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रथम पती पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा. आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा. परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै २०२० रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर चौकशी होऊन या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खुन व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते. त्याबाबतचा कसूरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार डॉ.उगले यांनी गुरुवारी नरेंद्र सोनवणे याच्या निलंबनाचे आदेश काढले.


Protected Content

Play sound