यावल प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण संरक्षण दिनानिमित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील हिंगोणा येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फीरोज तडवी, डॉ.मुकेश सुफे, घनश्याम डोळे, अशोक तायडे, कैलास कोळी आदी मान्यवर उपस्थितीत होते. राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्ह्या अध्यक्ष गुणवंत निळे, उपजिल्ह्याध्यक्ष राज कोळी, सरचिटणीस विनोद पाटील, सरचिटणीस प्रशांत पाटील, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष राकेश सोनार, लीलाधर चौधरी, जितेंद्र निळे, सुभाष पाटील, शरीफ तडवी, हितेश गजरे, भिकन मराठे, सुनील इंगळे, हिंगोणा येथील पत्रकार शब्बीर खान यांच्याहस्ते परिसरात वृक्षारोपण केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी मानले. यावेळी हिंगोणा प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी व त्यांचे सर्व सहकार्यानी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. दरम्यान वृक्ष लागवडीपासून त्यांच्या संपुर्ण संगोपणाची जबाबदारी आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्विकारली.