Home क्राईम मुंबई पोलिसांमधून कोणीतरी रियाला मदत करतय ; वकिलाचा खळबळजनक आरोप

मुंबई पोलिसांमधून कोणीतरी रियाला मदत करतय ; वकिलाचा खळबळजनक आरोप


मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांमधून कोणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप सुशांतच्या वडिलांच्या वकिलाने केला आहे. अॅड.विकास सिंह यांनी केलेल्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिने तर सीबीआय चौकशीसाठीही याचिका दाखल करायला हवी होती. तसेच पटणामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने आता मुंबईत सुनावणीची मागणी केली. यासोबतच हे संपूर्ण प्रकरण मुंबई पोलिसांकडे देण्याची याचिकाही दाखल केली. त्यामुळे अजून कोणता पुरावा हवा ज्यावरून कळेल की मुंबई पोलिसांमधून कोणीतरी तिला मदत करत आहे, असा आरोप विकास सिंह यांनी केला आहे.


Protected Content

Play sound