Home Cities जळगाव शानभाग विद्यालयाचा निकाल १०० टक्के; समीक्षा लुल्हे प्रथम

शानभाग विद्यालयाचा निकाल १०० टक्के; समीक्षा लुल्हे प्रथम


जळगाव प्रतिनिधी । शालांत परिक्षेत शानभाग विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थींनी ९९.८० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम आली आहे.

माध्यमिक शालांत दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात शानभाग विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. यात समिक्षा विजय लुल्हे ९९.८०टक्के, कोटीज्या जन्मेजय नेमाडे ९८.२० टक्के, आकाश अनिल धामणे ९८ टक्के, ओम सतिश येवले ९७.८० टक्के तर कृतिका सतीश अग्रवाल ९७.४० टक्के मिळवून यश संपादन केले आहे.

संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणारे दोन विद्यार्थी तर विज्ञान विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविणारे तीन विद्यार्थी आणि गणित विषयात ९९ गुण मिळविणारे दोन विद्यार्थी आहेत. दहावीच्या परिक्षेत विद्यालयाचे २३६ विद्यार्थी पास झाले आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ६७ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यन ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संचालकमंडळाने अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound