जळगाव (प्रतिनिधी) येथील ढाके कॉलनीस्थित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राच्या वतीने महाशिवरात्री महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संध्याकाळी महाआरतीचे आयोजन, सकाळी शिवध्वजारोण व प्रतिज्ञा, दिवसभर 30 फुटी शिवलिंगाचे दर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
जळगाव शहरात प्रथमच तीस फुटी शिवलिंगाचे निर्माण करण्यात आले होते. या प्रसंगी महाआरती मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. सकाळी ढाके कॉलनी सेवाकेंद्रात शिवध्वजा रोहण, प्रतिज्ञा आणि उदघाटन आदिंचा समावेश होता. या प्रसंगी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, महापौर सीमाताई भोळे, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टी शरद जोशी, प्रमोद वाणी, माजी आमदार गुरूमुख जगवाणी माजी उपजिल्हाधिकारी एन.आर.पाटील पांडुरुग काळे, बाविस्कर, पोस्ट मास्टर, डॉ. किरण पाटील, शंाताराम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.