जळगाव (प्रतिनिधी)।विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशीनाथ पलोड पब्लिक स्कुल येथे महाशिवरात्री चे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापिका अमितसिंह भाटिया व समन्वयीका स्वाती अहिरराव यांच्याहस्ते शंकराचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शंकराच्या जीवन चारित्र्यावर नाटिका सादर केली. तर देवेंद्र झारे या विद्यार्थ्याने महाशिवरात्रीचे महत्व विशद केले.तर स्वाती देशमुख व शिवानी कापसे यांनी हे शंभू देवा हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज जैस्वाल यांनी केले तर आभार नरेंद्र भोई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त पलोडच्या विद्यार्थ्यांनी सादर केली नाटीका
6 years ago
No Comments