मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षारक्षकांना काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता.
रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षारक्षकाची कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मातोश्रीची चिंता वाढली आहे. दरम्यान, यापूर्वीही मातोश्री परिसरात अनेक कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. या परिसरातील काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या आधीही मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’ असलेल्या कलानगर परिसरातील काही पोलिसांना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर घबरदारीचा उपाय म्हणून गेले काही काळ उद्धव ठाकरे हे आपल्या वाहनाचे सारथ्य स्वत:च करताना दिसून आले होते.