जळगाव (प्रतिनिधी) तळागाळातील सर्वसामान्य घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. रस्त्यांअभावी तांड्या – वस्त्यांमधील विद्यार्थी शिक्षणापासून व ग्रामस्थ विकासापासून वंचित राहता कामा नये यासाठी मतांचा विचार न करता गावांची निकड व गरज लक्षात घेऊन मतदार संघाचा विकास साधण्याचा प्रयत्न करतोय. मला विरोधकांपेक्षा जनतेच्या विकासाची काळजी आहे. अशी विरोधकांवर खोचक टीका सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी केली. विटनेर तांडा येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
रस्ते व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
म्हसावद ते वाकडी , लमांजन ते कुऱ्हाडदे , विटनेर ते विटनेरतांडा व बिलखेडा ते बिलवाडी या 11 किलोमीटर रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या 11 किमीच्या रस्त्यांसाठी 5.50 कोटी रुपये निधी मंजूर आहे. तसेच म्हसवाद येथील व्यायाम शाळेचे लोकार्पण , बाग परिसर ,शिक्षक कॉलनी, इंदिरानगर व शिव कॉलनी येथे रस्ते कॉंक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक च्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्यमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच लमांजन येथे सुरेशदादा जैन व गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळांना टीव्ही संच व इतर साहित्याचे वाटपही करण्यात आले.तसेच हायमास्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले.
लमांजन बंधाऱ्याचे जलपूजन
10 -12 वर्षांपूर्वी लमांजन बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते मात्र 2 वर्षापासून सदर बंधारा नादुरुस्त झाल्यामुळे व देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे या बंधाऱ्यातून मोठया प्रमाणात पाणी लिकेज होऊन वाया जात होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी समितीने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता.याबाबत तात्काळ दखल घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून 8 महिन्यापूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 67 लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला होता. सदर लमांजन बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यामुळे काल सायंकाळी माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन गिरणा मातेला साडी-चोळीचा आहेर अर्पण करण्यात आला. बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे दुष्काळी परिस्थितीतही मुबलक पाणी साठा असल्याने गुलाबराव पाटील यांच्या मुळे खऱ्या अर्थाने शेतकरी हित जोपासले गेले असल्याचे मत माजी मंत्री सुरेश दादाजैन यांनी जलपूजन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी गिरणा बंधारा शेतकरी समितीमार्फत ना. गुलाबराव पाटील व सुरेशदादा जैन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळीशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य पवन सोनवणे , प्रताप पाटील, नाना सोनवणे, पं. स. सदस्य नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे, डॉ.कमलाकर पाटील, मु.ग्रा.सडक योजनेचे उपअभियंता जे.एस. सोनवणे , शाखा अभियंता दिनेश बेडीसकर, धोंडू जगताप, महेंद्र राजपूत, आबा चिंचोरे, दिनेश पाटील, सुनील बडगुजर, गजानन जगदाळे, लक्ष्मण पाटील, नारायण चव्हाण, दिलीप चव्हाण, विजय आमले, देविदास कोळी, जनार्धन पाटील, देविदास राठोड, साहेबराव वराडे ,चावदस कोळी, शरीफ खाटीक, भैया पटेल, सचिन राठोड यांच्यासह म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटातील सरपंच, शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन जि.प.चे माजी गटनेते विश्वनाथ पाटील यांनी तर आभार जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.