कृपा करुन जे घडले नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करु नका : उदयनराजे भोसले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही. रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असे त्यांनी सांगितले. शपथविधीच्या वेळी शरद पवार देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे तेथे काय घडले त्यांना विचारा. कृपा करुन जे घडले नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन सुरु असलेल्या वादावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.

 

उदयनराजे भोसले म्हणाले, सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला. माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले आहे. महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असे वाटते का? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असे फक्त नायडू म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितले. यानंतर व्यंकय्या नायडूंनी घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचे सांगितले. आदरणीय शरद पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा. जे घडले नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे,” असे उदयनराजे म्हणाले.

Protected Content