Home आरोग्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण !

0
42


परभणी (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. फौजिया खान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे.

 

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर खासदार फौजिया खान यांच्याविषयी माहिती देतांना सांगितले की, परभणी येथील नांदखेडा रोड येथे फौजिया खान यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानी असतानाच त्यांना कोरोना व्हायरस लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना चाचणी केली जाणार असून खान यांच्या घरासह नजिकचा परिसरही सील करण्यात आला आहे. दरम्यान, 63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यामध्ये त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली आहे.


Protected Content

Play sound