जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २०८ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगाव शहरासह अमळनेर व पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. आज २२५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये २०८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६८ रूग्ण हे जळगाव शहरातील असून त्या खालोखाल अमळनेर-३४ तर पारोळा -२८ तालुक्यात रूग्ण संख्या वाढली आहे. तर जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-१०, पाचोरा-८, भडगाव-६, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-८, रावेर-१, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर-१ असे एकुण २०८ रूग्ण आढळून आले आहे.
तालुका निहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- २०७२, जळगाव ग्रामीण-३५६, भुसावळ-७१२, अमळनेर-५७०, चोपडा-५२४, पाचोरा-२०७, भडगाव-३२५, धरणगाव-३४४, यावल-३५८, एरंडोल-३७६, जामनेर-४९७, रावेर-५४९, पारोळा-३९४, चाळीसगाव-२३३, मुक्ताईनगर-२५४, बोदवड-२०६, इतर जिल्हे-२७ असे एकुण ८ हजार ००४ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ८,००४ इतकी झाली आहे. यातील ५०५१ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच २२५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ४०० रूग्णांचा मृत्यू झाला असून २५५३ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.