मेहरूण परिसरात कोविड केअर गृपतर्फे आरोग्य तपासणी शिबीर (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोविड केअर ग्रुप या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आज मेहरुण साईबाबा मंदिर येथे नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांचे थर्मल टेस्टिंग तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात कोरोनाचा प्रतिबंध व्हावा म्हणून विविध संघटना संस्था यांचेमार्फत शहरात नागरिकांचे आरोग्य तपासणी केली जात आहे. यामध्ये आज हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, मौलाना आझाद फाउंडेशन ,स्वामी समर्थ फौंडेशन, सूर्या फाउंडेशन , सेवक सेवाभावी संस्था , कमल किशोर प्रतिष्ठान, सच्ची निस्वार्थी शक्ती ,अमन फाउंडेशन या संस्थांनी एकत्र येऊन कोविड केअर हेल्प ग्रुप स्थापन केला आहे. या हेल्प ग्रुपच्या माध्यमातून शहरात नागरिकांना कोविड प्रतिबंध माहिती तसेच जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांची थर्मल टेस्टींग केली जाते.तसेच परिवारासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप देखील यावेळी केले जाते . सुरक्षिततेसाठी प्रत्येक व्यक्तीस मास्क वाटप केले जात आहे. यामध्ये डॉ. सोनाली राहुल महाजन , डॉ. महेंद्र काबरा, डॉ. स्वाती सोनवणे , डॉ. नलिनी महाजन , सुरज सुनील झवंर, अनिल कासार, अतुल पाटील , जिनल जैन ,डॉ. आशरफ बागवान, स्थानिक नगरसेवक प्रशांत नाईक यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

दरम्यान, आरोग्य तपासणीसाठी भारती रवींद्र काळे ,राकेश कंडारे , फिरोज शेख , निशा पवार, विशाल शर्मा , प्रतीक्षा पाटील , हर्षाली पाटील , अर्चना सूर्यवंशी, भारती म्हस्के , अड. अभिजित रंधे, वर्षा पाटील , शरीफ शेख बागवान, उज्वला टोकेकर , धनश्री पाटील, दक्षता पाटील, किरण कोळी हे सर्व आरोग्य सेवक अथक परिश्रम घेत आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3713224285378063/

Protected Content