जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात नवीन ३१६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह भुसावळ आणि एरंडोल तालुक्यात संसर्ग वाढला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ३१६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल भुसावळ ४४ आणि एरंडोल २६ रूग्ण आढळून आले आहेत.
अन्य ठिकाणांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण १९, अमळनेर १५, चोपडा-७, पाचोरा-६; भडगाव-१; धरणगाव-१४; यावल-४; एरंडोल-२६; जामनेर -१६, रावेर २०, पारोळा-३; चाळीसगाव १५ व मुक्ताईनगर १६, बोदवड-१ अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६९७० इतका झालेला आहे. यातील ४२३५ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकुण उपचार घेत असलेले २३७७ रूग्ण आहेत. तसेच सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५७७; कोविड हॉस्पीटलमध्ये-१७४ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ५१४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३५८ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.