चोपडा, प्रतिनिधी । येथील नवकार फूड्सचे संचालक सुनील भवरलाल जैन यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेतल सुनील जैन ही १२वी वाणीज्य विभागात ८६% गुण मिळवून अकाउटं विषयात ९९ गुणासह विषेश यश संपादन केले.
नेतल जैनच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड .संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए.सुर्यवंशी ,उपप्राचार्य बी. एस. हाडपे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सी. आर. देवरे, प्रा. दिपक करणकाळ, प्रा. सायली जैन, प्रा.सौरभ जैन, प्रा. श्रुतम अग्रवाल, प्रा.उज्वला भट, प्रा.व्ही.डी. शिंदे यांच्या सह सर्व स्थरातून कौतुक होत आहे. प्रा.प्रविण जैन, आनंद जैन, इलीयास पटेल सर यांच्यासह आई वडीलांचे विशेष मार्गदर्शन लाभले. .नेतल जैनला पुढे सी.ए. करायचे आहे असे तिने बोलतांना सांगितले. ती पत्रकार लतीश जैन यांची पुतणी आहे.