आगीत झालेले नुकसान
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागात आज पहाटे लागलेल्या आगीत काही घरे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.
प्राप्त माहितीनुसार आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात आग लागली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्यास मदत केली. मात्र यात काही घरे पूर्णपणे खाक झाल्या असून यात राहणार्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तसेच या आगीत आजूबाजूच्या काही घरांचे नुकसानदेखील झाल्याचे वृत्त आहे.