सरकारी मका खरेदी केंद्रांची संख्या वाढवा : महात्मा फुले ब्रिगेडची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी । सरकारी मका खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महात्मा फुले ब्रिगेडतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून जागा नसल्याने व्यापाऱ्यांना परस्पर मका विकलेला आहे अशा शेतकऱ्यांना फरकाची रक्कम शासनाने जाहीर केलेला हमीभावानुसार देण्यात यावा. शासनाने मका खरेदी इलेक्ट्रिक काट्याने लवकरात लवकर खरेदी करावे. खरेदी केंद्रावर होणारा काळाबाजार थांबवावा. व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जर व्यापाराला मका विकला असेल तर त्या खाली झालेल्या जागेवर नोंदणी केलेल्या पुढील शेतकऱ्यास घेण्यात यावे सदर दुसरा शेतकऱ्यास घेऊ नये . नोंदणी केलेल्या शेतकऱ्यालाच घ्यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा फुले ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष नरेंद्र ( राजू ) महाजन , उपाध्यक्ष जगदीश जगताप , महात्मा फुले ब्रिगेड जिल्हा संघटक व बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील , तालुका संघटक लक्ष्मण माळी , बामसेफ उपाध्यक्ष हेमंत माळी, छत्रपती क्रांति सेना लक्ष्मण पाटील , राजे प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष वैभव पाटील , महात्मा फुले ब्रिगेडन सचिव नितेश वासुदेव महाजन , महात्मा फुले ब्रिगेड सहसचिव नितीन महाजन , प्रसिद्धी प्रमुख विजय महाजन सहप्रसिद्धी प्रमुख , भुषण महाजन ), तुषार माळी , विशाल माळी, अतुल माळी , मयुर माळी , राजू पाटील , हेमंत माळी , सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content