जळगावसह जिल्ह्यातील व्यापारी संकुले बंदच राहणार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यातील व्यापारी संकुले अर्थात शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंदच राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आजच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. यामुळे संकुलांमधील हजारो दुकानदारांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून जळगाव, भुसावळ व अमळनेर शहरात काही अटी व नियमांच्या अधीन राहून १४ जुलैपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. यात जळगाव शहरातील गोलाणी, फुले मार्केट आदींसह अन्य शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्व राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून शहरातील संकुलांमधील दुकाने सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. तथापि, जिल्हाधिकार्‍यांच्या नोटिफिकेशनमध्ये याला स्पष्टपणे नाकारण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मान्यता असलेली दुकाने हे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान सुरू राहणार असले तरी यात संकुलांमधील दुकाने आणि शॉपींग मॉल्सला परवानगी नसेल असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. यामुळे शहरातील हजारो दुकानदारांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content