रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील मंगळुर व गंगापूरी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भोकर नदी वरील मंगळुर धरणानाचे शाखा अभियंता महेश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने मंगळुर धरण शंभर टक्के भरल्याचे शाखा अभियंता महेश पाटील यांनी सांगितले. नागोई नदीवरील गंगापूरी धरण देखिल शंभर टक्के भरल्याचे प. स. सदस्य जुम्मा तड़वी यांनी सांगितले. तालुक्यात जरी पाऊस नसला तरी शेजारील मध्य प्रदेश राज्यात पाऊस झाल्याने रावेर तालुक्यातील दोन्ही धरणांना याचा लाभ मिळाला आहे.