रावेर,प्रतिनिधी । शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरसेवकांनी १३ ते १७ दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे अवाहन केले होते. यावरून प्रचंड मत-मतांतर निर्माण झाले असून आज सर्व पक्षांतर्फे रावेर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन शहरात लॉकडाऊन लावण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
सर्वपक्षीयांतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापार व व्यवसाय विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे मजूर वर्गाचे प्रचंड हाल होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून स्वतःची काळजी घेण्याचे अवाहन सर्वपक्षीय निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी भाजपा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, गोटू शेट, राष्ट्रवादी सोपान पाटील, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, बाळु शिरतुरे, शेख गयास, शेख रफीक आदीचे निवेदनावर सह्या आहे.