साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील वाघूर नदीच्या पात्रात आज अजून एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्त असे की, साकेगाव जवळून वाहणार्या वाघूर नदीच्या पात्रात दोन दिवसापूर्वी एकाचा बुडून मृत्यू झाला होता. संबंधीत मयत व्यक्ती हा राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराकडे कामाला असून तो नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर पाईपात अडकून मरण पावला होता. यानंतर आज पुन्हा वाघूर नदीच्या पात्रात एक मृतदेह आढळून आला आहे. मयत व्यक्ती हा येथील गणपती नगरातील रहिवासी विनोद सुरेश सोनवणे ( वय ३९ ) असल्याची माहिती समोर आली आहे. वाघूर नदीच्या नवीन पुलाच्या खालील बाजूला जुन्या फरशीवजा पुलाजवळ असलेल्या डोहात त्यांचा मृतदेह आज तरंगतांना आढळून आला असून या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात माहिती देऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.