पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी। पहूर पेठ येथील संतोषीमाता नगरात राहणार्या वृद्ध दाम्पत्यास कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आजच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन केले असून त्यांचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात आला आहे.
पहूर पेठ येथील संतोषीमाता नगरात राहणार्या ६५ वर्षीय महिला व ७० वर्षीय पुरुषाचा काल स्वॅब घेण्यात आला होता . दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शिक्षक मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज सायंकाळी या वृद्ध दाम्पत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पहूर येथील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून येथील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.