Home आरोग्य भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण !

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण !


लातूर (वृत्तसंस्था) लातूरमधील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अभिमन्यू पवार यांच्या मुलाला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

अभिमन्यू पवार यांनी मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली होती .मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. तसेच लातूर मधील आरोग्य सेवेवर माझा विश्वास आहे, त्यामुळे लातूरातच उपचार घेण्याचा निर्णय घेतला असून माझ्या व परिक्षितच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घ्यावे, तसेच कोरोना चाचणी देखील करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी ट्वीवट्च्या माध्यमातून केले आहे. शिवाय काही काम असल्यास मला मेसेज करावा, आमची दोघांची तब्यत बरी आहे, काळजी करू नये, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही लवकरच बरे होऊ, आपणही आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, असे आवाहनही अभिमन्यू पवार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound