Home Cities जळगाव पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेच्या जिल्हा युवाध्यक्षपदी लखन सजोले यांची नियुक्ती

पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेच्या जिल्हा युवाध्यक्षपदी लखन सजोले यांची नियुक्ती

0
110

जळगाव प्रतिनिधी । पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी वराड सीम येथील लखन संजय सजोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, उपाध्यक्षा संगीता पाध्ये व सचिव सौरभ हजारे यांनी केली आहे.

लखन सजोले यांनी विभागात केलेल्या पर्यावरणीय कार्याची दखल घेऊन तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत अंतर्गत पर्यावरण मित्र या नात्याने पर्यावरा रक्षण व समाजकार्याचे निस्वार्थ व प्रामणिक कार्य करावे तसेच आपल्या भविष्यातील पर्यावरणीय वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले आहे. जळगाव जिल्हा युवाध्यक्ष लखन सजोल यांची नियुक्ती झाल्याने सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound