मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता ८५ हजार ७२४ वर पोहोचली आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता ८५ हजार ७२४ वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मुंबईमध्ये ही संख्या ४९३८ इतकी आहे. भारतात आतापर्यंतची एकूण ७१९,६६५ सकारात्मक प्रकरणे आढळून आली असून आतापर्यंत ४३९९४८ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण २० हजार १६० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. गेल्या २४ तासांत २२२५२ नवीन प्रकरणे आढळली आहेत. सोमवारच्या आकडेवारी नुसार राज्यात ८७,६८१ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोना रुग्णांमधील रिकव्हरीचे प्रमाण ५४.३७ टक्के आहे. तर नवीन ३५२२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण ११५२६२ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.