भुसावळ प्रतिनिधी । जळगाव शहर, भुसावळ आणि अमळनेरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उद्यापासून सात दिवसांसाठी लॉकडाऊनचे आदेश काढले आहे. यासंदर्भात भुसावळ येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षिय बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
याबैठकीत विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आप आपले विचार मांडले. यावेळी भारीप बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी लाँकडाऊनच्या दरम्यान जर दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या उत्तर कार्यक्रमाला किती लोकांची परवानगी आहे व ती परवानगी कोणाकडून घ्यावी तसा खुलासा करावा अशी सुचना मांडली. तर नगरपालिकेचे भाजप गटनेते हाजी मुन्ना तेली यांनी म्हटले आहे कि, आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन करतो मात्र आधीच लाँकडाऊन मुळे रोजदांरी करणाऱ्या मजुरांवर बिकट परीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने त्याचा हि विचार करावा अशी सुचना माडली.
बैठकीस यांची होती उपस्थिती
यावेळी प्राताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धिवरे, आमदार संजय सावकारे, प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलिप भागवत, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, उल्हास पगारे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक रविंद्र सफकाळे, सुनील नेवे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, अल्पसंख्याक विभाग कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मनुवर खान, कॉग्रेस शहराध्यक्ष रविद्र निकम, किशोर पाटिल, नगरसेविका सोनीताई बारसे, शकुंतुलाबाई बारसे, बीजेपी शहराध्यक्ष दिनेश नेमाडे व नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटु ठाकुर आदी उपस्थित होते.