Home Cities चाळीसगाव …आणि त्यांनी दुकानाला दिले ‘अभिनंदन’ नाव ! ( व्हिडीओ )

…आणि त्यांनी दुकानाला दिले ‘अभिनंदन’ नाव ! ( व्हिडीओ )

0
46

चाळीसगाव प्रतिनिधी । पाकिस्तानमधून भारतात सुखरूप आलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा गौरव करण्यासाठी शहरातील एका टेलरने आपल्या दुकानाचे आजच ‘अभिनंदन’ असे नामकरण केले आहे.

याबाबत वृत्तांत असा की, चाळीसगाव भारताचे जाबाज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज भारतात सुखरूप परत आल्याचा आनंद प्रत्येक भारतीय वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत आहेत. यातच चाळीसगावातील टेलरिंग काम करणार्‍या मनोज सुरेंद्र कापडणे यांनी आज आपल्या दुकानाचे सुरेंद्र टेलर्स हे नाव बदलून अभिनंदन टेलर्स असे ठेवल्याने चाळीसगाव शहरात त्यांचे कौतुक होत आहे. अशा प्रकारे भारतीय जवानांन प्रति आणि देशाप्रती आपले प्रेम व्यक्त करता येते हा आगळावेगळा प्रकार मनोज कापडणे यांनी दाखवला आहे.

पहा : अभिनंदन टेलर्सच्या नामकरणाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound