नाशिक (वृत्तसंस्था) सातवा वेतन आयोग फरक प्रकरणी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, या अटकेमुळे शिक्षणक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मागील महिन्यात नाशिकमध्ये दोन व्यवस्थापकांना १९ हजार ७१५ रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. यात शरद जाधव आणि जयप्रकाश कुवर या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनाही तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी आणि नियमित पगार काढून देण्यासाठी लाच मागितली होती. त्यानुसार, नाशिकच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांना अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद जाधव, जयप्रकाश कुवर यांची चौकशीत रामराव बनकर यांचे मोबाईलवरील संभाषणाचा पुरावा एसीबीच्या हाती लागला. त्यानंतर बनकर यांचा या लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचे झाले उघड झाले. अखेर आज, लाचलुचपत विभागाने बनकर यांना अटक केली आहे.