संतापजनक : तक्रारदार महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्याने केले हस्तमैथुन

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील देवरियामधील भटनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्याने हस्तमैथुन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. भीष्मपाल सिंग यादव असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

 

पोलीस ठाण्यात भीष्मपाल सिंग यादव याच्याकडे एक महिला तक्रार नोंदवण्यासाठी यायची तेव्हा हा अधिकारी तक्रारदार महिलेसमोरच हस्तमैथुन करायचा. शेवटी पिडीत महिलेने एकेदिवशी या घटनेचा छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनविण्याचे ठरविले. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या चेंबरमध्ये महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महिलेने शूट केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content