भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी योगदान दिले आहे . तसेच बहुजन समाजाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहिले अशा शरद पवार यांच्या विषयी अर्वाच्य भाषेत टिका करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सामाजिक तेढ निर्माण करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर योग्य कार्यवाही करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रविंद्र पाटील, सचिन चौधरी, शहराध्यक्ष नितिन धांडे, डॉ.दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, संतोष माळी, नगरसेवक दुर्गेश ठाकुर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.