चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सिमेवर भारतीय जवानांवर भ्याड हल्ल्ह्यात अनेक जवान शहीद झाले. चीन केलेल्या भ्याड हल्ला प्रकरणी चाळीसगावात सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने चीनचे राष्ट्राध्यक्षांचा पुतळ्याचे दहन केले. व चीनी वस्तू वापरू नका, स्वदेशी वस्तू वापरा असा नारा देत निषेध नोंदविला.
भारतीय सीमेवर जवानांवर अत्यंत भ्याडपणे हल्ला करून त्यात जवान शहीद झाले आहेत. चिनचा हा निचपणा सुरूच असून त्याचा संपूर्ण भारतभर निषेध होत असताना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्गसंवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्तानी स्वाभिमानी चळवळ या नावाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी चळवळ सुरु केली आहे. या चळवळीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर स्वदेशी वस्तू वापरा व चिनी वस्तूंचा बहिष्कार करा, असे आव्हान करण्यात येत आहे. जेणेकरून चीनची आर्थिक कोंडी होईल व चीन हा माजलापणा करणार नाही, त्याचाच एक भाग म्हणून आज सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावमार्फत चिनी राष्ट्राध्यक्ष सिजिन पिंग याच्या पुतळ्याचे दहन करून चीनचा निषेध करण्यात आला व चिनी वस्तू वापरू नका स्वदेशी वस्तू वापरा असे आव्हान करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी चीनच्या आर्थिक नांग्या ठेचण्यासाठी चिनी वस्तूंचा बहिष्कार करा, असे आवाहन करत असतानाच सह्याद्री प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत संपूर्ण भारतभर ही चळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा निषेध नोंदवण्यासाठी किसनराव जोर्वेकर, दिलीप घोरपडे, शुभम चव्हाण, विवेक रणदिवे, अजय जोशी, योगेश शेळके, गजानन मोरे, जयवंत शेलार, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुशिंग, विनोद शिंपी, जितेंद्र वाघ, सचिन पाटील, पप्पू पाटील, पप्पू राजपूत, दिगंबर शिर्के, पंकज पाटील, निलेश हमलाई, गौरव पाटील, प्रवीण गोत्रे, अजय घोरपडे, सचिन घोरपडे, सोहम येवले, अनिल कुडे, हर्षवर्धन साळुंखे, आकाश शेळके, सचिन पाटील, अरविंद घोरपडे, सुवर्णा राजपूत, अजीज शेख, सोनू महाजन, अनिल सोनार, रामलाल मिस्तरी, किरण मोरे, बबलू जाधव, किरण महाजन, सुरज जोशी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.