भुसावळ प्रतिनिधी । येथील शनि मंदिर परिसरातील व्यापार्यास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणार्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात भाग ५ गुरण ०६६७/२०२० भा द वि कलम-३९४,३२३, ५०४,५०६,३४ आर्म ऍक्ट कलम-३/२५ प्रमाणे दिनांक २२.०५.२०२० रोजी ०२.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे.
संबंधीत गुन्ह्यातील फिर्यादी नामे राजेश रमाशंकर दुबे रा.शनिमंदिर वॉर्ड भुसावळ हे दिनांक २१ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचे भाऊ संतोष दुबे व राहुल चौधरी सोबत भुसावळ शहरात आठवडे बाजारात मध्ये सिमेंट ओट्यावर बसलेले होते. यावेळी बाबा काल्या व रईस याच्या सोबत दोन इसम अशानी फिर्यादिस सिगारेट मागण्याच्या कारणावरून बाबा काल्या याने त्याच्या कमरेतून पिस्तुल काडून फिर्यादिस बंदुकीचा धाक दाखवला. त्यांनी फिर्यादीचा १५००० रु कीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन शिवीगाळ व धमकी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील गुन्हा घडल्या पासून फरार आरोपी नामेआशिक उर्फ बाबा काल्या असलम बेग (वय-२२ रा.अयान कॉलनी भुसावळ व शेख रहीस शेख नईम (वय-१९ रा.पंचशील नगर भुसावळ) यांना पोलीस निरीक्षक दिलीप भाववत यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून घोडेपिर बाबा भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, पोना किशोर महाजन, समाधान पाटील, रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पोका विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देखमुख, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.