माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंह वाघेला यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

गांधीनगर वृत्तसंस्था । गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव शंकरसिंह वाघेला यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शंकरसिंह वाघेला यांनी २०१९ च्या निवडणुकांवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह अहमदाबादहून मुंबईत येत वाघेला यांनी हाती ‘घड्याळ’ बांधलं होतं. परंतु राष्ट्रवादीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्याने शंकरसिंह वाघेला नाराज होते. अखेर शरद पवारांना पत्र लिहित वाघेलांनी राजीनामा दिला.

७९ वर्षीय शंकरसिंह वाघेला हे १९७० ते १९९६ अशी तब्बल भाजप २६ वर्षे भाजपमध्ये होते. तर १९९८ ते २०१७ ही १९ वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये घालवली. त्यांनी राजकीय कारकिर्दीत पाचव्यांदा एखाद्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Protected Content