जळगाव प्रतिनिधी । सूफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा वृत्तनिवेदक आमीष देवगण याच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी पियुष कोल्हे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
पियुष ललीत कोल्हे यांनी आज रामानंद पोलीस स्थानकात निवेदन देऊन वृत्तवाहिनीचा कार्यकारी संपादक तथा निवेदक आमीष देवगण याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, देवगण याने सूफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या बाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधीत पत्रकाराच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावर पियुष ललीत कोल्हे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.