Home आरोग्य रावेर तालुक्यात सात नवीन कोरोना बाधीत रूग्ण

रावेर तालुक्यात सात नवीन कोरोना बाधीत रूग्ण

0
33

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात आज पुन्हा सात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा देऊन संबंधीतांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यास प्रारंभ केला आहे.

याबाबत वृत्त असे की, आज दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये रावेर तालुक्यात सात नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात शहरात तीन; वाघोदा येथील दोन आणि खानापूर व चिनावल येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. यात शहरातील रूग्णांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत असली तरी अद्यप संसर्ग कमी होत नसल्याचे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढल्याचे दिसून आले आहे.


Protected Content

Play sound