Home आरोग्य रावेर तालुक्यात तीन नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

रावेर तालुक्यात तीन नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

0
36


रावेर प्रतिनिधी । तालुक्यात रावेर शहरात दोन तर कोचुर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून संबंधीतांचा रहिवास असणारा परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज तालुक्यात तीन नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात कालचा एक तर आज रात्री उशीरा आलेल्या दोन रूग्णांचा समावेश आहे. यात तालुक्यातील कोचुर येथे एक रुग्ण तर रावेर शहरात दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. या वृत्ताला तहसिलदार उषाराणी देवगुणे यानी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या रूग्णांच्या रहिवासाच्या परिसरात फवारणी करण्यात येत असून हा भाग सील करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound