भुसावळ, प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील बारा पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी जळगाव येथे रहिवास असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ११ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना रेल्वे रुग्णालयातील कोविड सेंटरमधुन सुट्टी देण्यात आली आहे. सहकारी पोलीस कर्मचारी सुखरूप घरी परतल्याचा आंनद व्यक्त करीत कर्मचाऱ्यांवर फुलाची उधळण करीत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले .
कोरोनाशी लढा देत असतांना अहोरात्र कर्तव्य बजावत असणाऱ्या भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रेल्वे रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले त्याचा आनंद व्यक्त करीत सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून पुष्पगुच्छ देऊन सहकारी कर्मचाऱ्याचे जंगी स्वागत केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड , बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे , तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
लिंक
https://www.facebook.com/watch/?v=279355546549084