जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगर परिसरात एक घर भाड्याने घेऊन यात कुंटणखाना चालविणार्या महिलेसह दोन अन्य महिलांना पोलीसांनी छापा टाकून अटक केली आहे.
वाघनगर भागातील शिक्षक कॉलनीमध्ये एका घरात बाहेरून महिला येऊन देहविक्रय व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून या कुंटणखान्यावर छापा टाकला. या छाप्यात विजय सोनवणे याच्यासह कुंटणखाना मालकीन आणि अन्य दोन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल, रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. हे घर एका पोलिस कर्मचार्याचे असून विजय आनंदा सोनवणे (वय ३६, रा. पाण्याच्या टाकीजवळ खंडेरावनगर) यांने भाड्याने घेतले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.