Home आरोग्य यावल येथील दोन रूग्णांची कोरोनावर मात

यावल येथील दोन रूग्णांची कोरोनावर मात


यावल प्रतिनिधी । शहरातील सुदर्शन चित्र मंदीर परिसरात राहणारे दोन डॉक्टरांची कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहे. दोघांचे घरी आगमन होताच नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

शहरातील सुदर्शन चित्र मंदीर परिसरात राहणारे डॉक्टर गेल्या २५ दिवसांपासून डॉक्टर पितापुत्र कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपुर्वी मुगला बरा होवून त्याला घरी सोडण्यात आले होते. काल पिता डॉक्टरसह इतर आणखी एका डॉक्टर यांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने दोघांनी कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करून त्यांनी घरी सोडण्यात आले होते. वास्तव्यास असलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना संसर्गाशी उपचार करून त्यावर मात करणाऱ्यांची देखील हळुवार का होईना संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.


Protected Content

Play sound